दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानी यांच्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांचे भांडवल बुडाले असून शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान सहन करावे लागले असले तरी अलीकडेच स्टॉकमध्ये उसळीसह व्यवहार होताना दिसत आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. कधीकाळी २५५ रुपये प्रति शेअरच्या किमतीवर व्यवहार करणारा अनिल अंबानींच्या कंपनीचा हा स्टॉक आज १६ रुपये प्रति शेअरवर आपटला आहे.
शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. परंतु असेही अनेक शेअर्स आहेत ज्यात गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे. असाच एक स्टॉक देशातील दिग्गज रिलायन्स समूहाचाही असून रिलायन्सच्या या शेअरचे नाव रिलायन्स पॉवर लिमिटेड आहे.