करमाळा (सोलापूर) : करमाळा बायपास येथील हॉटेल राजयोग समोर भरधाव वेगात आलेल्या नवीन टेंम्पोच्या चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या पिकपला धडक धडक देऊन घाडगेपाटील समुहाच्या सिमेंट दुकानात घुसला. हा आपघात एवढा भिषण होता की, टेम्पोच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला असून याध्ये चालक अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थनिक नागरिकांना कसरत करावी लागली. पीकपचेही यामध्ये नुकसान झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत.

करमाळा बायपास येथील अपघात हा प्रथमदर्शनींकडून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पों नगरकडून टेंभुर्णीकडे जात होता. तर पीकप टेंभुर्णीकडून नगरकडे जात होता. तेव्हा शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

भरधाव वेगात आलेला टेम्पो पीकपला धडक देऊन साधारण ६० फुटावर असलेल्या दुकानात घुसला. या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलिस प्रदीप जगताप व दीपक कांबळे घटनास्थळी दाखल झाले. अडकलेला चालक बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतः मदत केली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले.

दुकातील व्यक्ती थोडक्यात बचावल्या
टेंम्पो घुसलेल्या दुकानात अपघात होण्याआधी तेथील व्यक्ती अवघ्या काही वेळापूर्वी तेथून दुसर्या ठिकाणी गेल्या होत्या. त्यामुळे मोठी हानी टळली. अन्याथा या अपघातात मोठे नुकसान झाले असते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *