करमाळा (अशोक मुरूमकर) : काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या एका बॅनरने करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. नेमकी ही नाराजी का आहे? याचे कारण समजू शकलेले नाही.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर काँग्रेसचे चिन्ह आहे. त्यावर त्यांचा स्वतःचा मोठा फोटो आहे. त्याला शुभेच्छुक देखील तेच स्वतः आहेत. त्यावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असाही उल्लेख आहे. मात्र त्या बॅनरवर काँग्रेसचे राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा धवलसिंह मोहिते पाटील यांचाही फोटो नाही.
कोणताही सण उत्सव म्हटलं की वरिष्ठ नेत्यांचे बॅनरवर फोटो लावले जातात. पक्षातील किंवा गटातील वरिष्ठांचे यावर फोटो असतात. काँग्रेसमध्येही कोणताही बॅनर असला तरी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लीकार्जून खर्गे यांचे फोटो असतात. त्यानंतर इतर नेत्यांचीही त्यावर फोटो असतो मात्र करमाळ्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचेच फोटो गायब झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.