करमाळा (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून मिळालेली उमेदवारी योग्य आहे, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या उमेदवारीचे स्वागत केले आहे.
चिवटे म्हणाले, खासदार निंबाळकर यांनी विकास कामासाठी दिलेले योगदान व सर्व शिवसैनिकांना दिलेले मानाचे स्थान यामुळे सर्व शिवसैनिक मनापासून काम करणार आहेत. तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. करमाळा तालुक्यातील रेल्वे स्टेशनचा विकास व रेल्वेने ठिकाणी मिळालेले थांबे हे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. जातेगाव- टेंभुर्णी या मार्गासाठी 935 कोटीचा निधी मिळाला आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला कर्ज पुनर्गठन करण्यासाठी शासकीय हमी देण्यासाठीही त्यांनी आश्वासन दिले आहे.