Thanks to State Govt for Renaming Ahmednagar District Punyashlok Ahilya Devi Nagar Vinod Mahanavar

करमाळा (सोलापूर) : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य सरकारने याबाबत सरकार आदेश जारी करत अहमदनगरचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केले आहे. याबद्दल राज्य सरकारचे धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करत असलेचे मत भाजपचे जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले आहे.

महानवर म्हणाले, जुलमी राजसत्ता असलेली अहमदनगरचे नाव बदलून याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ठेवणे म्हणजेच महाराणी अहिल्यादेविंच्या कार्याचा गौरव राज्य सरकारने केला आहे. ही बाब एक धनगर समाजासाठी व मी एक प्रतिनिधी म्हणून अभिमानास्पद आहे. हा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सर्वच धनगर नेते कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *