करमाळा (सोलापूर) : सरकारने शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक केले आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या नाव फलकावरही आईचे नाव बंधनकार केले आहे. त्यानुसार करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या फलकावरही आईचे नाव झळकले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यानुसार शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीत 19 निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार नावाच्या फलकावरही आईचे नाव दिसू लागले आहे.