करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त पुण्यश्लोक फाऊंडेशनच्या वतीने त्यांना ‘मल्हाररत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचा हा सत्कार झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, कार्यक्रमाचे संयोजक धनंजय तानले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जेऊर येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. तेव्हा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल गादीया, सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झाजूर्णे, सुनील तळेकर, माजी उपसरपंच धनंजय शिरस्कर, माजी सदस्य विनोद गरड, ग्रामपंचायत सदस्य उमेश कांडेकर,माजी सरपंच भारत साळवे, हंबीरराव चव्हाण, राकेश गरड, बापूसाहेब घाडगे, राजू गरड, धनंजय घोरपडे, मुबारक शेख, महेश कांडेकर, बहुजन संघर्ष सेनेचे गरड, शांताराम सुतार आदी उपस्थित होते.