करमाळ्यात साळुंखे यांच्या निवासस्थानी शितलादेवी मोहिते पाटील यांनी दिली भेट

Shitladevi Mohite Patil visited the residence of Salunkhe in Karmala

करमाळा (अशोक मुरूमकर) : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील यांनी आज (बुधवारी) करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढारचिंचोली, कात्रज, राजुरी, कुंभारगाव, सावडी येथे भेटी दिल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी मोहिते पाटील समर्थक अमरजित साळुंखे यांच्याही निवासस्थानी त्यांनी भेट देऊन संवाद साधला आहे. दिगंबरराव साळुंखे, डॉ. अमोल घाडगे यांच्यासह डॉ. स्वाती घाडगे यांच्याशी त्यांनी संवाद साधून मत जाणून घेतले आहे.

भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थक नाराज झाले आहेत. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदार संघात दौरा सुरु केला आहे. मोहिते पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत उतरावे अशी भावना व्यक्त केली जात असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिकांकडून मत जाणून घेतले जात असल्याचे मोहिते पाटील यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *