करमाळा (सोलापूर) : ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा करमाळ्यात परिणाम झाला आहे. करमाळ्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक पंपावर ‘पेट्रोल नाही’, असे फलक लागले असून वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे. वाहन कायद्यात बदल करावा या मागणीसाठी ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. त्यात पेट्रोल व डिझेल वाहकही सहभागी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. करमाळा येथे पोथरे, रिलायन्स व करमाळा शहरातील पंपावर पेट्रोल मिळत नाही. करमाळा शहरातील भाजी मंडई परिसरातील पेट्रोल पंपावर दुपारपर्यंत पेट्रोलसाठी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर तेथीलही पेट्रोल संपले असल्याचे सांगण्यात येत आहे. नालबंद मंगल कार्यालय येथेही पेट्रोल नसल्याचे सांगितले जात आहे. ट्रान्सफोर्ट संघटनेने काही वेळेपूर्वीच हा संप मागे घेतला असून ट्रक चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *