करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांनी म्हसवड येथे आज (गुरुवारी) मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी करमाळा विधानसभा मतदारसंघातून शेकडो गाड्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी या मेळाव्यात शक्तीप्रदर्शन केले आहे. साधारण शंभर गाड्या घेऊन आम्ही निघालो असल्याचे त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना त्यांनी सांगितले आहे.
तालुकाध्यक्ष वारे म्हणाले, महाविकास आघाडीकडून अभयसिंग जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निमीत्ताने मतदारांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडी ज्याला उमेदवारी देईल त्याला आम्ही मताधिक्य देणार आहोत. मोहिते पाटील महाविकास आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.