सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी ३९ अर्ज खरेदी झाले असून यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील व नितीन सोपानराव वाघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अर्ज घेतले आहेत. तर भाजपाकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अर्ज घेतले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत मोहिते पाटील यांचा प्रवेश निश्चित झाला असून फक्त उमेदवारी कोणाला मिळणार हे पहावे लागणार आहे. रमेश नागनाथ बारसकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा अर्ज घेतला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव, अर्जाची संख्या व पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे : संदीप जनार्दन खरात (4 अपक्ष), रोहित रामकृष्ण मोरे (3 अपक्ष), बाळासाहेब रामकृष्ण मोरे (1 अपक्ष), अजित नामदेव साठे (1 महाराष्ट्र विकास सेना पक्ष), राजेश तानाजी खरे (1 महाराष्ट्र विकास सेना श्री.अनिल तानाजी साठे), पृथ्वीराज शहाजीराव पाटील (2 अपक्ष), पृथ्वीराज शहाजीराव पाटील (1 अपक्ष (अभिजीत सुखदेव जाधव)), पृथ्वीराज शहाजीराव पाटील (1 अपक्ष (संजय महादेव चव्हाण), जैनुद्दिन दस्तगीर शेख (1 अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (1 अपक्ष), सचिन हणमंत गवळी (1 अपक्ष), खंडू भिमराव घडे (1 अपक्ष), खंडू भिमराव घडे (1 अपक्ष (श्री. अमोल मधुकर करडे)), प्रकाश किसन पोळ (2 आरपीआय (A)/ अपक्ष (श्री. संतोष बाळासाहेब बिचकुले)), गणपत परमेश्वर भोसले (1 अपक्ष), विजयराज बाळासाहेब माने देशमुख (1 अपक्ष), नवनाथ बिरा मदने (1 अपक्ष), प्रभाकरदादा दत्तात्रय जानवेकर (1 जंग महाभारत संघ), रमेश नागनाथ बारसकर (3 वंचित बहुजन आघाडी), शिलवंत गुणवंत क्षिरसागर (2 अपक्ष श्री. सुधाकर तुकाराम सोनटक्के), दत्तात्रय विठ्ठल थोरात (2 अपक्ष), गिरीश प्रभाकर शेटे (4 अपक्ष), ॲड. नितीन जयसिंगराव खराडे-4-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील), गणेश सिध्देश्वर भिंगे (2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील), मल्हारी गुलाब पाटोळे (1 आम समाज समता पार्टी ऑफ इंडिया अपक्ष), खंडू भिमराव धडे (1 अपक्ष (अमोल मधुकर करडे), सुनिल गुंडा जाधव (2 बहुजन मुक्ती पार्टी), सिकंदर दादामिया कोरबु (1 अपक्ष), नानासो रामहरी यादव (2 अपक्ष), सतिष शिवाजी जंगम (4-भाजपा (श्री. रणजितसिंह हिंदुराव नाईक-निंबाळकर), गणेश मारुती शेजाळ (1 अपक्ष श्री. कल्याण मगन बाबर), अमोल मधुकर करडे (2 अपक्ष), आण्णासो सुखदेव मस्के (1 अपक्ष), नितीन सोपानराव वाघे (1 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार/राष्ट्रीय आदर्श जनता पार्टी), रामचंद्र मायाप्पा घुटुकडे (1 न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), राघु येताळा घुटूकडे (1 अपक्ष), भाऊसाहेब सुखदेव लिगाडे (2 अपक्ष), गणेश अशोक चौगुले (1 अपक्ष) व परमेश्वर पांडुरंग गेजगे (1 अपक्ष).