Urgent meeting of Shivsena Thackeray group in Karmala Determined to announce roles in front of senior leaders

करमाळा (सोलापूर) : शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, तालुका संपर्कप्रमुख राजू राणे, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल यांच्या आदेशाने माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (ठाकरे गट) प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शिवेसना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या नेतृत्वाखाली झाली.

महाविकास आघाडीमध्ये माढा लोकसभेची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना महत्त्वाचा पक्ष असून करमाळा तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकांची संख्या तिस ते पस्तीस हजारांहून अधिक आहे. मात्र मागील अनूभव पाहता निवडणुक झाल्यानंतर विजयी झालेल्या खासदारांकडून शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. भविष्यात शिवसैनिकांवर अशी वेळ येता कामा नये यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेऊन शिवसैनिकांचे मत वरिष्ठांपर्यंत पोहचवून निर्णय घेण्याचे एकमताने ठरले आहे. मेळावा होईपर्यंत शिवसेनेचा एकही पदाधिकारी अथवा शिवसैनिक प्रचारात सक्रिय होणार नाही, असे उपजिल्हाप्रमुख फरतडे, तालुका संघटक प्रवीण कटारीया व उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर यांनी जाहीर केले.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

या बैठकीस उपतालुकाप्रमुख अ‍ॅड. विकास जरांडे, बंडू शिंदे, उपशहरप्रमुख पंकज परदेशी, संतोष गानबोटे, माजी विभाग प्रमुख अविनाश गाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा सचिव आदेश बागल, केम शिवसेना शहरप्रमुख सतीश खानट, महिला आघडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, करमाळा युवासेना शहरप्रमुख समीर हलवाई, युवासेना उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे, अभिषेक मोरे, माऊली फरतडे, रामेश्वर पांढरमिसे, युवासेना शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, अदित्य जाधव, भिम क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष शहाजीराव धेंडे, लालू कुरेशी, भाऊ मस्तुद, विभाग प्रमुख, मयुर तावरे, सोमनाथ पौळ, शिवाजी नाईकनवरे, शाखा प्रमुख ओकांर कोठारे, माजी उपसरपंच विजय माने, माजी उपसरपंच जोतीराम घाडगे, माजी उपसरपंच उत्तम हनपूडे, शाखा प्रमुख दिगंबर काटूळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *