करमाळ्यातील ‘या’ भाजप कार्यकर्त्याने दिला राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड केले आहे. ते आज (रविवारी) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर करमाळ्यातील त्यांचे समर्थक अमरजित साळुंखे यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे त्यांनी सदस्य व पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे यांच्याकडे तालुका सरचिटणीस पद होते.

भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी कमालीची नाराजी व्यक्त करत भाजप सोडले. आता ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आज त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. मोहिते पाटील यांच्या बरोबर आपण असून त्यांना विजयी करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असून प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *