करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथे मंगळवारी (ता. १४) ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ कार्यक्रम होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने शनी मंदिर परिसरामध्ये पहाटे ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पार्श्वगायक संदीप पाटील प्रस्तुत भव्य संगीतमय पहाट हा भावगीत, भक्तीगीत, चित्रपट गीतांचा समावेश असलेला कार्यक्रम आहे. यावेळी पार्श्वगायिका रोहिणी अरोही, निवेदक उद्धव काळापहाड, कृष्णा जाधव, संगीत संयोजक दिलावर शेख, पॅड & ड्रम वादक गौतम गुजर, तबला वादक ललित भूमकर, ढोलकी वादक सोनू साळवे यांच्यासह राज्यातील प्रसिद्ध कलाकार उपस्थित राहून कार्यक्रम सादर करणार आहेत.

यावेळी २ हजार १२१ दिव्यांचा भव्य दीपोत्सव सोहळाही होणार आहे. उपस्थित महिलासाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रमही घेण्यात येणार असल्याची माहिती संयोजक ग्रामस्थांनी दिली आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी विघ्नेश इंटरप्रायझेस पुणे, हॉटेल चिवटे फॅमिली रेस्टोरंट करमाळा, देवी ज्वेलर्स यांनी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमांना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ‘काय सांगता’ न्यूज पोर्टल मीडिया पार्टनर असणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *