सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील ३८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील दोघांचे अर्ज आहेत. पात्र अर्जांपैकी माघार कोण घेणार हे पहावे लागणार आहे. ३८ उमेदवारांचे अर्ज राहिले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील व महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातच होणार आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर यांचाही अर्ज आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-2-1024x738.jpg)
माढा लोकसभा मतदारसंघात १० अर्ज पक्षाचे आहेत. तर २८ उमेदवार अपक्ष आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मोहिते पाटील, भाजपचे निंबाळकर व वंचितचे बारस्कर हे उमेदवार आहेत. दाखल अर्जामध्ये बसपाकडून स्वरुपकुमार जानकर, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे सिद्धेश्वर आवारे, भारतीय जवान किसान पार्टीचे गोपाळ जाधव, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे रामचंद्र घुटुकडे, बहुजन महा पार्टीचे शाहजन शेख, स्वराज सेना महाराष्ट्रचे सत्यवान ओंबासे, आरपीआय (ए) संतोष बिचुकले यांचे अर्ज आहेत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Matosrhi-2-2-1024x606.jpg)
अपक्ष म्हणून अनिल शेंडगे, अमोल करडे, अशोक वाघमोडे (निलज, करमाळा), काशिनाथ देवकाते, किरण साठे, संदीप खरात, गणेश चौघुले, गिरीश शेटे, धनाजी म्हस्के, नवनाथ मदने, नागेश हुलगे, नानासाहेब यादव, नारायण कळेल, नंदू मोरे, भाऊसाहेब लिगाडे, मनोज अनपट, रोहित मोरे, रशीद शेख, रामचंद्र गायकवाड, विनोद सीतापूरे (मेनरोड, करमाळा), ऍड. सचिन जोरे, सचिन देशमुख, गणेश सरडे, राहुल सावंत, सीताराम रणदिवे, हणमंत माने व लक्ष्मण हाके याचे अर्ज पात्र ठरले आहेत.