Mahayuti meetings in Karmala from Monday There will be planning in the entire taluk

करमाळा (अशोक मुरूमकर) : पश्चिम भागाचा विकास करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लीड दिला जाणार आहे, असे सावडीतील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मणआबा जाधव यांनी सांगितले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सवाडीत पहिला कॉर्नर सभा होत आहे. या सभेसाठी सावडीसह केत्तूर, कोंढारचिंचोली, कोर्टी, हिंगणी, देलवडी, पारेवाडी, दिवेगव्हाण आदी ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. आमदार संजयमामा शिंदे, बागल गट, जगताप गटासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), रासप, रयत क्रांती व आरपीआय (ए) पदाधिकारी उपस्थित आहेत.

खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सुरु असलेल्या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे ऍड. अजित विघ्ने यांनी केले. आमदार संजयमामा शिंदे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, सतीश शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, ऍड. नितिनराजे राजेभोसले, प्रियांका गायकवाड, अर्जुन गाडे, बाळासाहेब टकले, माजी उपसभापती लालासाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, जालींदर पानसरे, ऍड. अशोक गिरंजे, नीळकंठ अभंग, सुजित बागल, बबनराव मुरूमकर, डॉ. अभिजित मुरूमकर, अपसर जाधव, अशोक पाटील, बाळासाहेब कुंभार, विवेक येवले, किरण फुंदे, संतोष वाघमोडे, संतोष वारगड, सुभाष अभन्ग, जगदीश अगरवाल, दीपक चव्हाण, ऍड. सुमित गिरंजे, आशिष गायकवाड, शंकर कवडे, डॉ. गोरख गुळवे, सुहास गलांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, तालुका प्रमुख राहुल कानगुडे, नवनाथ गुंड, सरपंच तानाजी झोळ, संजय शिलवंत, अमोल पवार, संतोष कुलकर्णी आदी उपस्थित आहेत.

‘भाजप घटना बदल करणार नाही,’ असा विश्वास आरपीआयचे गाडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी निंबाळकरांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (सभा सुरु असून सविस्तर बातमी काही वेळातच)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *