करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीत उमरड येथील मतदार यादीमध्येे स्थलांतरित न झालेले व उमरड येथेच असलेल्या जिवंत माणसांच्या नावापुढे डिलीटचा शिक्का मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घ्या, अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेनी केली आहे. या प्रकारामुळे शेकडो मतदार मतदान करण्यापासून वंचित राहिले आहेत, याला जबाबदार कोण? हे शिक्के कोणत्या कर्मचाऱ्यांनी मारले व कशाच्या आधारे मारले? याचा शोध घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम व ग्रामपंचायतचे माजी सरपंच संदीप मारकड- पाटील, पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे यांनी निवेदन देत ही मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वीकारले व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.