करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पोलिसांनी पुन्हा एखादा मोठी कारवाई करत देहविक्रीचा व्यवसाय सुरु असलेल्या जिंती हद्दीतील लॉजवर छापा टाकला आहे. यामध्ये १० संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५९ – 3,4,5 नुसार यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
जिंती हद्दीतील हॉटेल अमोलमध्ये महिलांना ठेऊन देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. दोन पंच व बनावट ग्राहक पाठून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लॉजचा व्यवस्थापक अजितकुमार जयसिर शेट्टी (वय ३७, रा. होसूर निड्युटी होसमाने, ता. कुंदापूर, जि. उडपी, कर्नाटक), हॉटेलच्या मॅनेजरचा मदतनीस सोहेल गुलमहंमंद अन्सारी (वय २१, रा. राहबाद, ता. देवीपुर, जि. देवघर, झारखंड), राजेंद्र मुरलीधर वाळेकर (रा. भिलारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), तुकाराम अनिल गोडसे, सागर बाळासाहेब जाधव (दोघे रा. पाळसमंडळ, ता. माळशिरस), अक्षय विश्वास ओहोळ, निखिल राजेंद्र गाडेकर (दोघे रा. पिंपळगाव, ता. दौड), महेश पांडुरंग जाधव, गणेश दिलीप जाधव व तात्या रामचंद्र जाधव (तिघे रा. नीर वांगी, ता. इंदापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. बनावट ग्राहक पाठवून या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा देहविक्री करण्यासाठी महिलांना येथे डांबून ठेवल्याचे समोर आले. ग्राहकांकडून पैसे घेऊन हा व्यवसाय केला जात होता. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.