पुणे : सहकार विभागातील दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्य सरकारच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थाचे अनिल कवडे यांनी हा आदेश काढला आहे. यामध्ये करमाळा येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तिजोरे हे सध्या करमाळा अर्बन बँकेचे प्रशासक म्हणूनही काम पाहत होते. जामखेड येथे त्यांची बदली झाली आहे. याशिवाय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) रवींद्र र. पाटील यांची बदली जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे झाली आहे. उत्तर सोलापूरचे सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे याची बदली सहाय्यक निबंधक (२) अधीन जिल्हा उपनिबंधक, सोलापूर येथे झाली आहे. नाशिक येथील सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांची बदली कोल्हापूर येथे झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अंनतपाळ येथील सहाय्यक निबंधक संजय कुलकर्णी यांची बदली बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे झाली आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील सहाय्यक निबंधक अमोल वाघमारे यांची बदली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे झाली आहे. नागपूर येथील सहाय्यक निबंधक सुखदेव कोल्हे यांची बदली नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सहाय्यक निबंधक ओमप्रकाश साळुंखे यांची बदली वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे झाली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील सहाय्यक निबंधक अमोल डफळे यांची बदली सांगली जिल्ह्यातील जत येथे झाली आहे. याशिवाय पुणे येथील पणन (मूल्य), पणन संचालनायलय येथील सहाय्यक संचालक सांजवीनी देशमुख यांची बदली अर्चना गालेवाड यांच्या ठिकाणी पुण्यात झाली आहे.