मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर गाजत आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रशासनाकडून कुणबी मराठा दाखले देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची नागरिकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी यासाठी योग्य नियोजन केले आहे त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक दाखले करमाळा तालुक्यातून गेले आहेत.
कुणबी दाखले देण्यासाठी तहसीलदार ठोकडे यांनी योग्य नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे काही प्रमाणात दाखले देण्याचे राहिले होते. मात्र आता रेग्युलर दाखले वितरण केले जात आहे. कमी मन्युष्यबळ असतानाही आहे त्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत नागरिकांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. तालुक्यात साधारण २१ हजाराच्यापुढे कुणबी दाखले वितरीत करण्यात आले आहेत. येथे मुस्लिम कुणबी नोंद सापडलेल्या ३६८ बांधवाना दाखले देण्यात आले आहेत.
दाखले काढण्यासाठी शासकीय शुल्क व्यतिरिक्त जादा पैशाची मागणी करणारा निदर्शनास आल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देत सर्वसामान्य नागरिकांची कोणीही अडवणूक करू नका व त्यांची गैरसोय होणार नाही, असे काम करण्याची सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयातील संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी व संबंधित यंत्रणेचे काम सुरु आहे.
नागरिकांची अडवणूक होऊ नये म्हणून करमाळा तहसील कार्यालयातून प्रांताधिकारी यांच्याकडे सहीसाठी गेलेली व सही झाल्यानंतर आलेल्या प्रकरणाची यादी प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे सेतू विभागाचे जंहागीर यांच्याकडे गर्दीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. तेथून प्रकरण नागरिकांना मिळाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन दाखले मिळत आहेत. काही अडचण असल्यास तहसीलदार ठोकडे यांच्याशी थेट नागरिक संपर्क साधू शकत आहेत. दाखले देण्यासाठी नायब तहसीलदार काझी, अव्वल कारकून काझी यांचीही भूमिका महत्वाची असून दाखले मिळवून देण्यासाठी महत्वाची कामगिरी केली आहे.