Appeal for help for the treatment of a three year old child from Kugaon

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव येथील श्रवण किरण अवघडे या तीन वर्षाच्या चिमुकल्याला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी सात लाख खर्च अपेक्षित असून त्याला मदतीची आवश्यकता असून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुगाव येथील अवघडे याच्यावर पुणे येथील केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उपचारासाठी साधारण सात लाख खर्च अपेक्षित असून अवघडे हे पुणे येथे एका खाजगी कंपनीत रोजंदारीवर करत आहेत. उपचाराचा हा खर्च करण्यासारखी त्यांची आर्थिक स्थिती नाही. या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी समाजातील दानशूर मंडळींना मदत करण्याचे आवाहन कुगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छूक व्यक्तींनी किरण अर्जुन अवघडे यांच्या एक्सेस बँक धानोरी पुणे शाखा आयएफएससी कोड : UTIB0004160 व खाते नंबर : 923010048620191 यावर करावी किंवा 9359640392 या फोन पे नंबरवर पाठवावी, असे आवाहन कुगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *