कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील 1989 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

Karmaveer Annasaheb Jagtap Vidyalaya 1989 class 10th students get together

करमाळा (सोलापूर) : कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयत 1989 वर्षेच्या दहावीत आसलेल्या मित्र- मैत्रीणी 35 वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा साजरा झाला. या गेट टुगेदरसाठी कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील देशमाने, बापू माळी, सदाशिव हेगडे, युवराज चंदनशिवे, हरिदास काळे आणि अशा लता गायकवाड यांनी दोन महिन्यापासून सर्वमित्र- मैत्रिणींशी संपर्क साधुन ग्रुप तयार केला. आशा लता यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक गुलाबराव बागल उपस्थित होते. प्रशांत कांबळे, हारीदास काळे, संभाजी जगताप, सुनील देशमाने, आशोक काटुळे, रमेश कवडे, आर्जुन फंड, कला शिक्षक घोडके, खोसे माॅडम, शाहाने माॅडम, निफाडकर माॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. सिताराम हेगडे, प्रमोद असादे, वैशाली दोशी, दत्ता बडेकर, अनूप खोसे, रेखा कटारिया, समद शेख, योगेश राठोड, सिकंदर जाधव, धनंजय काटूळे, तुकाराम शिरसागर, आत्माराम रासकर, दस्तगीर मुजावर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. नितीन चोपडे यांनी सुत्र संचालन केले.

उपस्थित सर्व शिक्षकांनां सर्व विद्यार्थ्यांमार्फत गिफ्ट देऊन व जरीचे फेटे बांधून आदर व्यक्त केला. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी हे आपले दैवत आहे. याची पोच म्हणून आज काही विद्यार्थी सर्व क्षेत्रात आपापल्या पद्धतीने जे कार्यरत आहेत तीच आमची पोच होय असे संबोधन करून काही मागील आठवणींचा उजाळा दिला. हा कार्यक्रम एका दिवसासाठी नसून प्रत्येकाने कायमस्वरूपी एकमेकांशी संपर्क साधावा व एकमेकांच्या अडचणींना मदत होईल, असे संबोधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *