करमाळा (सोलापूर) : कामोणे तलावात माजी आमदार नारायण पाटील हेच पाणी आणू शकतात. तालुक्याच्या विकासासाठी नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी केले.
कामोणे येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या ‘जनसंवाद गावाभेट’ दौरा झाला. पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, पंकज नलावडे, अरुण काळे, सुहास जाधव, बाळू शिंदे, चिंटू भालेराव, विकास कांबळे, औदुंबर नलावडे, सचिन नलावडे, अतुल नलावडे, बिभीषण देमुंडे, दत्तात्रय खरात, मारुती भिसे, नारायण शिंदे, अशोक चोरगे, बाळासाहेब देवकाते, सुदाम नलावडे, विठ्ठल भिसे, प्रशांत शिंदे, पोपट पवार, प्रकाश खराडे आदी उपस्थित होते. बागल म्हणाले, रावगाव गटातील मांगी परिसरातील नागरिक आता बदल करण्याच्या मानसिकतेत आहेंत. माजी आमदार पाटील यांनी २०१४ ते २०१९ मध्ये अनेक कामे केली आहेत. कामोणेसह बिटरगाव श्री, पुनवर, आळजापूर, वडगाव उत्तर, खडकीत त्यांचा दौरा झाला.