करमाळा (अशोक मुरुमकर) : ‘मी खोटी आश्वासने देत नाही जे काम होणार तेच बोलतो’, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे. बऱ्याच दिवसांपासून मागणी असलेल्या कुगाव- चिखलठाण- शेटफळ- जेऊर या रस्त्याचे भूमीपूजन चिखलठाण नं. १ येथे आज (सोमवारी) झाले. या कामासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर झाले आहेत. आमदार शिंदे यांच्या हस्ते या कामाची सुरुवात झाली.
आमदार शिंदे म्हणाले, २०१४ पासून या रस्त्याची मागणी केली जात होती. आता हा रस्ता पूर्ण होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे काम होत असल्याने १५ ते २० दिवसात हा रस्ता पूर्ण होईल. मध्यंतरी सरकार अस्थिर होते त्यामुळे या कामाला उशीर झाला. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय काम करता येत नव्हते. आता हे काम पूर्ण होणार आहे.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे मी पूर्ण करत आहे. पाच वर्षात कोणतेच काम पूर्ण होत नसते. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा जो पाठपुरावा करणे आवश्यक असते. ते काम मी करत आहे. त्यातूनच दहिगावसाठी सर्वात जास्त निधी आणला आहे, असेही ते म्हणाले. ढिकसळ पुलाचे कामही मी पूर्ण करत आहे. राजकारण हे विकास कामावरच टिकत असते ते कोणाच्या पुण्याईने टिकत नसते असेही ते म्हणाले आहेत. टेंभुर्णी- जातेगाव हे काम देखील लवकरच सुरु होणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
चिखलठाण ते जेऊर या रस्त्याचे काम अत्याधुनिक पद्धतीने होत असून पहिल्यांदाच ही प्रक्रिया येथे राबवली जात आहे. तालुक्यातील वीज, शेती, सिंचन, रस्ते या कामासाठी आपण प्रयत्न करत आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पाटील, उपकार्यकारी अभियंता के. एम. उबाळे, चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, राष्ट्रवादीचे बाळकृष्ण सोनवणे, काँग्रेसचे सुनिल सावंत, लव्हेचे विलास पाटील, महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास निमगीरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, तरडगावचे सुदाम लेंडवे, तात्यासाहेब जाधव पाटील, अजिंक्य पाटील, केडगावचे शंभू बोराडे, झरेचे प्रशांत पाटील, नागनाथ पाटील, सुभाष अभंग, डॉ. गोरख गुळवे, संतोष गायकवाड, महादेव पोळ, सुजित बागल, अमर भांगे, उमेश इंगळे, शेटफळचे माजी सरपंच विकास गुंड, शिवाजी पोळ, गणेश कानगुडे, नेरलेचे समाधान दोंड, निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर, स्वप्निल पाडुळे, मारुती गुटाळ, राजेंद्र धांडे, रोहिदास सातव, अशोक तकीक, आशिष गायकवाड, मयुर रोकडे, सुहास रोकडे, सोमनाथ रोकडे, विनोद सरडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शंकर पोळ, सुहास गलांडे, उदय ढेरे, गोरख पारखे, शामराव गव्हाणे, सचिन गावडे, दादा सरडे, जोतीराम पवार, सचिन सरडे, डॉ. विकास वीर, तुषार शिंदे, सूरज ढेरे आदी उपस्थित होते.