करमाळा (अशोक मुरुमकर) : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक आहे. लोकसभेला मताधिक्य मिळाले म्हणजे विधानसभेला मताधिक्य मिळेल असे नाही. त्या निवडणुकीचे वातावरण वेगळे होते, आता संजयमामा शिंदे यांना पुन्हा आमदार करण्यासाठी आपण या भागातून मोठे लीड देणार आहे. या भागाचा विकास होण्यासाठी त्यांच्या मागे आपण उभा राहिले पाहिजे, असे आवाहन माजी सरपंच चंद्रकात सरडे यांनी केले आहे.
चिखलठाण येथे कुगाव ते जेऊर या रस्त्याचे भूमीपूजन आज (सोमवारी) झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, सुनिल सावंत, सरपंच तानाजी झोळ, विवेक येवले, सुहास गलांडे आदी यावेळी उपस्थित आहेत.
माजी सरपंच सरडे म्हणाले, कुगाव ते जेऊर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. याचे काम आता पुर्ण होणार आहे. या रस्त्याचे काहींनी राजकारण केले. मात्र आम्ही काम करून घेण्यासाठी पाठपुरावा करत होतो. लोकसभा निवडणुकीत वातावरण वेगळे होते. त्या निवडणुकीत मताधिक्य मिळाल्याने आपण विधानसभाही जिंकू असे काहींना वाटत आहे, असे म्हणत माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. आता तसे वातावरण नसुन आम्ही शिंदे यांना विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे सरडे म्हणाले.