करमाळा (अशोक मुरूमकर) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी ९६३ अर्ज रिजेक्ट झाले आहेत. आतापर्यंत ३१ हजार ९०० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ११६९ अर्ज मंजूर झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तालुकास्तरीय समितीकडून अर्जांची छाननी सुरु असून रिजेक्ट झालेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज एडिट करून भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गट विकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तालुक्यात ३१ हजार ९०० अर्ज दाखल झाले आहेत. त्याची छानणी तालुकास्तरावर केली जात आहे. लाभार्थी महिलेचे बँक खाते, आयएफसी कोड असणे आवश्यक आहे. याशिवाय बँक खाते आधार क्रमांकाशी सलंग्न असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने हमीपत्र दिलेले नाही अथवा त्यात त्रुटी आहेत. अर्जदार सरकारच्या १५०० पेक्षा जास्त रक्कमेचा लाभ घेत आहे, ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन आहे. कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. कुटुंबातील सदस्य सरकारच्या विभागात नोकरी करत आहे. सरकारच्या योजनेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष, सदस्य आहे, कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलेनी लाभ घेतला आहे. सादर कागदपत्रात तफावत, अशी प्रकरणे रिजेक्ट होत आहेत. त्यांनी पुन्हा व्यवस्थित एडिट करावीत, असे आवाहन केले आहे.