करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथे विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या श्रमसंस्कार शिबिर सुरु आहे. यामध्ये शेळ्या, मेंढ्या व जनावरांना लसीकरण करण्यात आले. करमाळा पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. झोळ, डॉ. गणेश बाबर, डॉ. राहुल जवळ, डॉ. दत्तात्रेय वाघमारे, सरपंच युवराज मगर, उपसरंपच शिवाजी कोकरे व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख, प्रा. सुजाता भोरे, प्रा. राहूल श्रीरामे, प्रा. संजय पाटील, प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. रोकडे उपस्थित होते.
