त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे सोलापूर जिल्हा अससोसिएशन वेटलिफ्टिंग निवड चाचणीत यश

करमाळा (सोलापूर) : येथील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबने अससोसिएशन वेटलिफ्टिंग जिल्हा निवड चाचणीत यश मिळवले आहे. सोलापूर येथील शिवाजी नाईट कॉलेज येथे आज (शनिवारी) वेटलिफ्टिंग जिल्हा निवड चाचणी झाली. यामध्ये जिल्ह्यातून विविध ठिकाणातुन खेळाडूंनी सहभाग घेतला. करमाळा येथील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबमधील राजलक्ष्मी सुतार व श्रेयस सरडे या खेळाडूंनी सहभाग घेऊन चकमदार कामगिरी करत सोलापूर जिल्हा अससोसिएशन वेटलिफ्टिंग राज्य निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशामागे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक सागर शिरस्कर यांचे योगदान मिळाले. दोन्हीही खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *