करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात सुरु असलेले बेकायदा व्यवसाय बंद करण्यात यावेत. या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. २८) करमाळा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले जाणार असल्याचा इशारा वांगी नंबर १ येथील देविदास कांबळे व करंजे ग्रामपंचायतीचे सदस्य शहाजी ठोसर यांनी दिला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना त्यांनी लेखी निवेदन दिले आहे.
ठोसर व कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘ करमाळा तालुक्यात बेकायदा वाळू उपसा, हॉटेलवर मद्यविक्री, मटका व जुगाराचे व्यवसाय सुरु आहेत. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर किरकोळ कारवाई केल्या जातात. मात्र पुन्हा असे व्यवसाय सुरु होतात. याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.’