करमाळा (सोलापूर) : कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे हायस्कुलमध्ये श्री विश्वंदन आयुर्वेदिकच्या वतीने ‘सुवर्ण प्राशन संस्कार’ शिबीर झाले. आयुर्वेदाचार्य नाडीतज्ञ व पंचकर्म तज्ञ डॉ. स्वप्नील लोणकर, बालरोग तज्ञ डॉ. प्रियंका लोणकर, डॉ. ज्योतीराम टकले, हुसेन मुलाणी यांच्या उपस्थितीत हे शिबीर झाले. या शिबीरात २०० विद्यार्थ्यांनी सुवर्ण प्राशनचा लाभ घेतला.
मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे, बौद्धिक क्षमता, ज्ञान आकलन क्षमता, तल्लख सदृढ आणि प्रभावशाली बनण्यासाठी हे शिबीर घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक सुवर्ण प्राशनचे महत्व व फायदे याची माहिती सांगण्यात आली. शाळेचे सचिव राजकुमार राऊत, मुख्याध्यापक जाकीर मुलाणी, उपमुख्याध्यापक तृप्ती राऊत, विकास पाठक उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग भगत यांनी केले.