करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रमजाननिमित्त आलिफ मस्जिद व इंदिरानगर मस्जिद येथे इफ्तार पार्टी झाली.
यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले, संभाजी ब्रिगेड सर्व जाती धर्मातील बांधवाना एकत्र घेऊन चालणारी संघटना आहे. जातीमध्ये तेड निर्माण न करता सर्वांना एकत्रित घेऊन काम करणारी व विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी ही संघटना आहे. समाजात सलोखा राखण्याचे काम कित्येक वर्षापासून संभाजी ब्रिगेड करत आहे. तालुका उपप्रमुख दादासाहेब थोरात, बाळासाहेब झोळ, बालाजी गावडे, निलेश पाटील, सुहास पोळ, अतुल निर्मळ, पांडुरंग घाडगे, पिंटू जाधव, आदिनाथ माने, अजित उपाध्ये, महेश कांडेकर, अविनाश घाडगे, हेमंत शिंदे, किशोर कदम, जयकांत गावडे, विजयकांत गावडे यांच्यासह दोन्हीही मस्जिदमध्ये बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/03/Ajinkya-Patil-1024x494.jpg)
![Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/04/Dhale-3-1024x613.jpg)