करमाळा (सोलापूर) : महसूल पंधरवाडानिमित्त करमाळा तहसील कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यातूनच शनिवारी (ता. १०) आजी- माजी सैनिक यांच्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम झाला.
करमाळा तालुका तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार विजय लोकरे यांच्या उपस्थितीमध्ये तक्रार निवारण कार्यक्रम ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा पार पडला. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील आजी- माजी सैनिक, हुतात्मा जवानाचा परिवार, सैनिक परिवार यांच्या महसूल संबंधित अडचणी त्यांनी लेखी स्वरूपामध्ये तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे दिल्या.
आपल्या अडी अडचणी त्यांनी सांगितल्या. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणीही केली. नायब तहसीलदार लोकरे यांनी सांगितले की, तहसीलदार ठोकडे यांच्या समोर हे सर्व अर्ज आणि या विषयावर सविस्तर चर्चा आणि माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यावेळी आजी- माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुकाची सर्व टीम उपस्थित होती. मोठ्या संख्येने सैनिक ही उपस्थित होते. तहसील कार्यालय करमाळा यांचे वतीने आलेल्या सर्व आजी- माजी सैनिक यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत व सन्मान केला. आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे यावेळी उपस्थित होते.