इंदापूर (पुणे) : स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या प्रांगणात ध्वजारोहण झाले. सकाळी ८ वाजता विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य निलेश काळदाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. मार्चपास (परेड) सादर केले. प्राचार्य निलेश काळदाते यांनी उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहिले पाहिजे तरच त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे सांगितले. याप्रसंगी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे व इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योती जगताप उपस्थित होते.
इंदापूरमधील विद्या प्रतिष्ठान संकुलात स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा
