करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मृतदेहाचा पंचनामा करून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहाची ओळखी पटवण्याचे काम सुरु आहे. अर्धनग्न अवस्थेत हा मृतदेह आढळला असून त्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे करत आहेत.


