करमाळा शहरात माजी सैनिक कल्याणकारी संस्था कारगील भवनच्या भूमिपूजनावेळी.

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरु आहे. आज (शुक्रवार) ३ कोटी २६ लाख २६ हजार ५०० रुपयांच्या कामांचे भूमीपूजन झाले आहे. यामध्ये सौन्दे येथे ६६ लाख ५० हजार व करमाळा शहरात तब्बल २ कोटी ६० लाखांच्या कामांचे भूमीपूजन झाले आहे.

मौलालीमाळ येथील दफनभूमी पाणीपुरवठा करणे या कामाच्या फलकाचे उदघाटन करण्यात आले.

करमाळा शहरात माजी सैनिक कल्याणकारी संस्था कारगील भवनसाठी २० लाख मंजूर झाले आहेत. याचे आज भूमिपूजन झाले. याशिवाय मौलालीमाळ दफनभूमी पाणीपुरवठा करणे, लादीकरण, संरक्षक भिंत बांधणे व इतर सुविधांसाठी २० लाख मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले. सिद्धार्थनगर येथील ख्रिश्चनभूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे, पाणी पुरवठा करणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे यासाठी २० लाख मंजूर असून त्याचेही भूमिपूजन झाले. राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग अंतर्गत करमाळा भुईकोट किल्ला जतन व दुरुस्तीसाठी २ कोटी मंजूर असून त्याचेही उदघाटन झाले.

सिद्धार्थनगर येथील ख्रिश्चनभूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे या कामाच्या फलकाचे अनावरण करतेवेळी उपस्थित मान्यवर.

सौन्दे येथे आमदार स्थानिक विकास निधीमधून एसटी सॅन्डसाठी ३ लाख ५० हजार मंजूर झाले असून त्याचे भूमीपूजन झाले. सौन्दे ते सरफडोह रस्त्यासाठी २० लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन झाले. जिल्हा परिषद शाळा खोली बांधण्यासाठी ११ लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन करण्यात आले. वडार समाज मंडूर दुरुस्तीसाठी ५ लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन झाले. पेव्हिंगब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख मंजूर असून त्याचे भूमीपूजन झाले व जिल्हा परिषद शाळेत २० लाखाच्या दोन वर्गखोल्याचे लोकार्पण झाले.

राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग अंतर्गत करमाळा भुईकोट किल्ला जतन व दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करतेवेळी उपस्थित मान्यवर.

सौन्दे येथे भूमीपूजनावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) भारत औताडे, उपसरपंच उमेश वीर यांच्यासह करमाळा येथे ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, राष्ट्रवादीचे अशपाक जमादार, अभिषेक आव्हाड, चंद्रकांत चुंबळकर, सागर गायकवाड, राजेंद्र पवार, सरपंच किरण फुंदे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *