करमाळा (सोलापूर) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावले आहे, असे प्रतिपादन आई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी केले आहे. श्रीराम प्रतिष्ठान व भाजप कामगार आघाडीच्या वतीने बांधकाम कामगार मेळावा झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक विनोद घुगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष राम ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, माजी सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, बंडू शिंदे, आजिनाथ सुरवसे, विनोद महानगर, उमेश मगर, सोमनाथ घाडगे, धर्मराज नाळे, दीपक गायकवाड, गणेश परदेशी, सोमनाथ घाडगे, किरण शिंदे, संदिपान कानगुडे, जेष्ठ नागरिक सेलचे तालुकाध्यक्ष विष्णू रंदवे, आदिनाथचे माजी संचालक हरिभाऊ झिंजाडे, भैया गोसावी, लक्ष्मण शेंडगे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, माजी सरपंच नितीन निकम, सुनील जाधव, प्रकाश ननवरे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश माने, दीपक गायकवाड, सतीश कोल्हे, सुनील नेटके, सुनील आल्हाट, पप्पू मंडलिक, दादासाहेब कडू, दिलीप चव्हाण, जयसिंग भोगे, मोहन नेटके, संदीप काळे, बापू मोहोळकर, हर्षल शिंगाडे आदी उपस्थित होते.
डांगरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे बांधकाम कामगारांना न्याय मिळाला आहे. कामगारांनी आरोग्याची काळजी घेत व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकामध्ये श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिवटे म्हणाले, भाजप सत्तेत आल्यापासून बांधकाम कामगारांना अनेक नवीन योजना लागू झाल्या. २०१७ मध्ये बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेत आमूलाग्र बदल करुन व्याप्ती वाढवली. बांधकाम कामगारांना शिक्षण, आरोग्य, विवाह ते शेवटपर्यंतच्या सर्व लाभाची योजना बनवल्या.
भाजपाचे तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे म्हणाले, बांधकाम कामगारांचा देशाच्या जडणंघडणीत मोठा सहभाग आहे. त्यांच्या कष्टाचा योग्य सन्मान व्हावा यासाठी भाजपने बांधकाम कामगार सारखी दूरदृष्टीची योजना बनवली आहे. चिवटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून १५ वर्षांपासून सामाजिक काम सुरु आहे. बांधकाम नोंदणी करण्यासाठी सहकार्य करणारे अभियंता प्रवीण गायकवाड, रोहित कोरपे, निलेश माने, लक्ष्मण कांबळे यांचा यावेळी सन्मान झाला.