करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी १ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संजय बिभीषण पाटील (वय २४, रा. वांगी नंबर १, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पेट्रोलिंग सुरु असताना वांगी येथे भिवरवाडी रस्त्याच्या बाजूला एकजण बेकायदा दारू विक्री करत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा संशयित आरोपी पाटील घराच्या मागे पत्रा शेडमध्ये बेकायदा दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडून ९०० रुपयांची १० लिटर गावठी दारू जप्त केली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.