Review meeting of BJP Panchayat Raj in view of Loksabha in Karmala

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंचायतराजचे गणेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे भाजपचे पंचायत राज महाविजय, माढा लोकसभा नियोजन व आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष निनाद पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

याप्रसंगी पंचायतराजचे जिल्हा उपाध्यक्ष अमरजित साळुंके यांनी प्रास्तविक केले व आजपर्यंतचा कार्याचा आढावा सादर केला. महाविजयच्या अनुषंगाने पटवर्धन व नितीन नागटिळक यांनी गाव पातळीवरील बूथ स्तरावरील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप यांची महाराष्ट्र प्रदेश भाजप निवडणूक समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदनचा ठराव करण्यात आला.

या बैठकीसाठी भाजप जिल्हा सचिव शाम सिंधी, पंचायतराजचे सोलापूर (प) जिल्हा अध्यक्ष नितीन नागटिळक, जिल्हा उपाध्यक्ष अमरजीत साळुंके, निता साखरे, तालुका अध्यक्ष रामराजे पाटील, माढा लोकसभा प्रमुख महेश शिंदे, सोलापूर लोकसभा प्रमुख साळे, विधानसभा प्रमुख समाधान कांबळे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, किरण वाळूंजकर, प्रशांत कुलकर्णी, शिवाजी जाधव, विशाल पाटील यांचेसह पंचायतराजचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार किरण वाळूंजकर यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *