करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळाच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून संभाजी ब्रिगेड कार्यालय येथे हे अभिवादन करण्यात आले. माजी प्राचार्य नागेश माने यांच्या हस्ते दाभोळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अनिल माने, राजेंद्र साने, बाळासाहेब दूधे यांनी अभिवादन गीत सादर केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश करे पाटील, यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोरेश्वर पवार, संतोष माने, श्रेयस साने, ओंकार माने, मनोज लटके, सुनील गायकवाड, रामचंद्र बोधे, डॉ. आप्पासाहेब लांडगे, केशव घाडगे, प्रथमेश माने, आनंदीताई घिगे पाटील, विष्णु शिंदे, महेश जगताप, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.