करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील संगोबा ते बोरगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडले असून येथे जाणे- येणे अवघड झाले आहे. याकडे त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ऍड. शशिकांत नरुटे यांनी केली आहे. येथे रोज लहान मोठे अपघात होत आहेत. वाहनांचीही नुकसान होत आहे.
