Wild vegetable festival in Solapur on Saturday

सोलापूर : शेत शिवारातील आरोग्यविषयक महत्व सर्वसामान्य नागरीकांना होण्यासाठी व उत्पादक ते ग्राहक अशी विक्री साखळी व्यवस्था बळकट करण्यासाठी कृषि विभाग व आत्मा यांच्या वतीने शनिवारी (ता. 31) सकाळी 9.30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे रानभाजी महोत्सव होणार असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक यांनी दिली.

सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी त्यांचे शेतावरील रानभाज्या प्रदर्शन व विक्रीसाठी महोत्सवात आणाव्यात. तसेच सोलापूर शहर व नजीकचे नागरीक व ग्राहकांनी सदरच्या महोत्सवास भेट द्यावी तसेच रानभाज्यांची खरेदी करावी. तसेच आरोग्यदायी रानभाजी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि व आत्मा विभागामार्फत करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *