पांडे येथे डासांचे प्रमाण वाढल्याने फवारणी करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडेमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असे नागरिक सांगत आहेत. फवारणीसाठी पांडे ग्रामपंचायतीने फवारणी यंत्र घेतले आहे. मात्र त्याचा वापर केला जात नाही. या यंत्राचा वापर करून फवारणी करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात दुर्गंधी असून याकडे लक्ष देऊन फवारणी करावी. डासांमुळे विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *