दसरा, कोजागिरी पोर्णिमानिमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

Liquor ban order issued on the occasion of Karthik

सोलापूर : नवरात्र महोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. 24) सोलापूर शहरात तर कोजागिरी पौर्णिमानिमित्त 27 व 28 ऑक्टोबरला सोलापूर- तुळजापूर महामार्गावर सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने, मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

विजयादशमीनिमित्त सोलापूर महापालिका हद्दीतील सर्व किरकोळ देशी, विदेशी मद्य विक्री, ताडी अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील. तसेच 27 व 28 ऑक्टोबर 2023 या दोन्ही दिवशी कोजागिरी पौर्णिमानिमित्त सोलापूर- तुळजापूर या मार्गावर श्री क्षेत्र रूपाभवानी मंदिरापासून पुढे तुळजापूर मार्गावर सोलापूर जिल्हयाच्या हद्दीत असणाऱ्या सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री, ताडी अनुज्ञप्त्या विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद राहतील. महाराष्ट्र मद्य निषेध आधिनियम मधील कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *