Teacher Day at Yashwantrao Chavan College

करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी प्राचार्य म्हणून महाविद्यालयातील बी. ए. भाग १ मधील विद्यार्थी विश्वंभर लांडगे यांनी काम पाहिले.

अध्यापनाचे कामकाज झाल्यानंतर महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये शिक्षकांचा सत्कार झाला. या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते. यावेळी प्रा. अभिमन्यू माने यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी अष्टपैलू असणे गरजेचे आहे. त्यांनी शिक्षकांकडून सर्व गुण अवगत करावेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. भाग १ मधील विद्यार्थीनी आफ्रिन मुजावर हिने व आभार प्रदर्शन कृष्णा पवार यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *