करमाळा (सोलापूर) : श्री. संत निवृतीनाथ महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी रावगाव येथे पाण्याची सोय करण्यासाठी प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने टँकर देण्यात आला आहे. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत रावगावचे दादासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
संत निवृत्ती महाराज पालखीच्या स्वागता प्रसंगी प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकरचे नियोजन केल्याबद्दल टंचाईच्या परिस्थितीमध्ये गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ केल्याबद्दल प्रा. रामदास झोळ यांचा सत्कार ग्रामपंचायत रावगाव येथे करण्यात आला. यावेळी रावगावचे सरपंच जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, गोपीनाथ झिंजाडे, सुदर्शन शेळके आदी उपस्थित होते.
प्रा. झोळ म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपणही काम केले असून सामाजिक उपक्रमासाठी आपण सहकार्य करणार असून, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व रोजगार मिळवुन देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.