करमाळा (सोलापूर) : मनोज जरांगे पाटील यांनी माढा, करमाळा, भूम- परंडा व बार्शी तालुक्यातून मराठा समन्वयकांची बैठक घेऊन प्रत्येक गावातील कमान २० मराठा सेवक (हक्काचा माणूस) यांची नाव नोंदणी करण्याबाबत सूचना केली आहे. या बैठकीसाठी करमाळा तालुक्यातून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ उपस्थित होते.

मराठा सेवक हे मराठा समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मदत करणार आहेत. मराठा समाजाच्या नोंदी, जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी करण्यास मदत करणे, शेती, शिक्षण, वैद्यकीय अडचणीबाबत मदत करणे तसेच सामाजिक अडचणी व इतर समस्या सोडण्यासाठी काम करणार आहेत.

प्रा. झोळ यांनी लगेच तातडीने मराठा बांधवांची बैठक घेऊन, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून मराठा सेवकांसाठी अर्ज भरून आजपासून नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक मराठा बांधवांनी आपले नाव नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *