Traffic regulation on palanquin routes from 21st to 29th June

सोलापूर : अकलूज व पंढरपूर या पालखी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखी दिंड्यांसोबत असणाऱ्या वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांनी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ३३ (१) (ब) अन्वये हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, ते दिनांक २१ जून रोजीच्या ००.०१ वाजल्यापासून ते २९ जून २०२३ रोजीच्या २४.०० वाजे पर्यंत लागू राहतील.

आदेशात म्हटले आहे, दिनांक २३ ते ३० जून या कालावधीत श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी संपन्न होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक २३ जून रोजी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत व दिनांक २४ जून  रोजी श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव वाखरी मार्गे पंढरपूरकडे येत असते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलुज, श्रीपूर, बोरगाव, तोंडले-बोडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरकडे येत असते. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. हे वारकरी पायी पंढरपूरकडे येत असतात. पालखीबरोबर त्यांच्या दिंड्या व वाहनेही सोबत असतात. त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होवू नये, याकरिता पालखी सोहळ्यादरम्यान पालखी सोहळ्यातील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करणे आवश्यक आहे.

त्यामुळे पालखी दिंड्यासोबत असणाऱ्या वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांनी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) उपलब्ध असणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे.

मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे –

मार्ग – पंढरपूरकडून पुणे येथे जाणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग – वाखरी-साळमुख चौक-पिलीव-म्हसवड-फलटण, पंढरपूर- टेंभुर्णी-पुणे

मार्ग – पुणे-फलटण येथून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग -फलटण चौक-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक, पुणे-टेंभुर्णी-पंढरपूर

मार्ग – अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग- अकलूज-टेंभुर्णी-सोलापूर

मार्ग- सोलापूर येथून पंढरपूर मार्गे अकलूजकडे जाणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग- सोलापूर- टेंभुर्णी- अकलूज

मार्ग – वेळापूर येथुन पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग – साळमुख चौक-सातारा रोड-पंढरपूर

मार्ग – सांगोला येथुन पुणेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग – सांगोला-साळमुख चौक-वेळापूर-अकलूज- इंदापूर

मार्ग – पुणे येथुन इंदापूर मार्गे पंढरपूर येथे येणाऱ्या वाहनांकरिता, पर्यायी मार्ग – पुणे- टेंभुर्णी-पंढरपूर

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *