Collector Kumar Ashirwad reviewed law and order on the occasion of assembly elections

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणूक 2024 कायदा व संस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलिस उपयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, पोलिस विभागाने लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोखपणे राहील यासाठी आवश्यक उपायोजना कराव्यात. लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कॅश किंवा दारू जप्त करण्यात आली होती अशा ठिकाणी पोलिस विभागाने सुरक्षा अधिक चोख ठेवावी. तसेच वलनेरब्ल व क्रिटिकल मतदान केंद्रावर योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असेही त्यांनी सुचित केले.

यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलिस प्रशासनाने नियोजन केलेले असून सर्व क्रिटिकल मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिस दल तयार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच वलनरेबल व क्रिटिकल मतदान केंद्राच्या अनुषंगाने सर्व पोलिस अधिकारी सेक्टर ऑफिसर यांचे प्रशिक्षण 21 सप्टेंबरला ठेवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *