Karmala couple shot dead while returning from relatives on motorbike wife dies on the spot husband dies during treatmentKarmala couple shot dead while returning from relatives on motorbike wife dies on the spot husband dies during treatment

करमाळा (सोलापूर) : कुर्डुवाडी- करमाळा मार्गावर सालसे चौकात एका बोलेरोने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले आहे. मनोज काळे गुरव (वय ४८) व पुष्पा मनोज काळे (वय ४२, रा. किल्ला वेस, करमाळा) असे त्याचे नाव आहे. या अपघातात पुष्पा काळे या जागीच तर मनोज काळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. २७) सायंकाळी हा अपघात झाला असल्याचे समजत आहे.

काळे दाम्पत्य माढा येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर गेले होते. तेथून परतत असताना सालसे चौकात हा अपघात झाला. बोलेरोने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. त्यात काळे गंभीर जखमी झाले. मनोज काळे यांना करमाळ्यात उपचारासाठी आणले. तेथून त्यांना बार्शी येथे पाठविण्यात आले. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व सून असा परिवार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *