करमाळा (अशोक मुरूमकर) : वन्यप्राण्याने जाळीत घुसून सहा शेळ्या फस्त केल्या असल्याचा प्रकार शेटफळमध्ये घडला आहे. हा हल्ला कोणत्या प्राण्याने केला हे उघड झालेले नाही. मात्र लांडग्याच्या कळपाचा हा हल्ला असल्याचा संशय वन विभागाला असून याचा तपास सुरु आहे.
शेटफळ येथील बळीराम रामदास रोंगे यांनी नेहमीप्रमाणे शेतात जाळीत सहा शेळ्या ठेवल्या होत्या. सर्व काम संपल्यानंतर ते घरी आले. काल (बुधवारी) सकाळी ते शेतात गेले तेव्हा तीन मोठ्या शेळ्या जागेवरच फस्त केल्याचे दिसले. तर तीन लहान कऱ्हड दिसून आली नाहीत. शेजारी असलेल्या उसात ओढत नेहून त्यांनाही फस्त केले असल्याचे ते सांगत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार वन विभागाने पंचनामा केला आहे. मात्र त्या शेळ्या कशाने फस्त केल्या हे उघड झालेले नाही. बिबट्याने हा हल्ला केलेला नसून लांडग्याच्या कळपाचा हा हल्ला असल्याचा संशय आहे की दुसरा कोणता वन्यप्राणी होता याचा तपास सुरु आहे. या भागातील ठसे देखील घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
तुझा भाऊ आमच्या विरोधात कलेक्टरांकडे तक्रार करतोय म्हणत निमगावमध्ये मारहाण; दोन गटाच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा
‘ती’ हाणामारी वाळूवरून! याकडे कोण गांभीर्याने पहाणार का?
कुणबी दाखल्यासाठी लाच मागणारे मंडळ अधिकारी ‘एसीबी’च्या ताब्यात